कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुन्हा ‘या’ तारखांना मुसळधार पाऊस होणार, वेधशाळेनं वर्तविला ‘अंदाज’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोल्हापूर आणि सांगली मधील पूर आता कुठे जरा जरा ओसरू लागला असतानाच वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातल्या घाट क्षेत्रामध्ये येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

सतत पडणाऱ्या पावसाने सोमवारी जरा विश्रांती घेतली होती आणि थोड्या वेळासाठी का होईना पण काही ठिकाणी सूर्य नारायणाचे दर्शन झाले होते, मात्र आता पुन्हा वेधशाळेने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच कोकणातही पाऊस पडणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे.  यंदाच्या या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. पण या सगळ्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे.

मराठी कलाकारांपासून ते सर्वसामान्य लोक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अनेक धार्मिक संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे आला होता. कोल्हापूर, सांगलीतल्या पूरपरिस्थितीनंतर आता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर थांबला आहे. त्यामुळे पूर ओसरण्यास मोठी मदत होईल.

जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं आहे. जायकवाडीतून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे यामुळे मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली असताना ऐन दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर ओसरल्यानंतरही कोल्हापूरकरांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. रोगराई पासून ते अनेक रोजच्या जीवनातील गोष्टींच्या टंचाईला कोलापूर आणि सांगलीकरांना सामोरे जावे लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like