पुण्यासह ‘या’ 12 जिल्ह्यात 11 सप्टेंबरला मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशाच्या आगमनानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याची पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. तर कोल्हापुरातही पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे. पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, धुळे, सोलापूर, जालना, औरंगाबाद, उस्मानाबादमध्ये 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर आला आहे. तर दुसरीकडे पुण्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणातून 70 हजार क्यूसेकने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. उजनी धरणाच्या 16 मोर्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –