सावधान ! मुंबई, ठाणे आणि कोकणात आजही मुसळधार पाऊस

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारीही मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणीही साचले आहे. त्यामुळे ट्राफिकची समस्याही निर्माण झाली होती.

राज्यात मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने हाहाकार उडाला आहे. दररोज हजारापेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आढळून येत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यातच आता पाऊस सुरू असल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

शक्य असेल तर घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा असे आवाहन सरकारने केले आहे. गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव भरून वाहत आहे. यावर्षीही हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.