गडचिरोलीत वादळी पावसाने डॉ. बंग यांच्या संस्थेत ‘झाडपडी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना गडचिरोलीत आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे बीएसएऩएलचा टॉवर कोलमडला. विद्युत तारा देखील मोठ्या प्रमाणात तुटल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसात डॉ. अभय बंग व डॉ राणी बंग यांच्या सर्च संस्थेच्या आवाराताील अनेक झाडे देखील उन्मळून पडली आहेत.

बंग सर्च संस्थेचा संपूर्ण परिसर हा झाडांनी वेढलेला आहे. अनेक झाडे उंच वाढली आहे. पण आज झालेल्या वादळाचा तडाखा या झाडांना बसला. यात मोठमोठी झाडे तुटली तर काही रस्त्यावर उन्मळून पडली. झाडांच्या मोठ्या फांद्या विजेच्या खांबावर कोसळल्याने खांबही वाकले. काही ठिकाणी तारा तुटल्या. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. एवढी झाडे उन्मळून पडण्याची ही पाहिलीच वेळ होती. वादळी पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून आले आहे.