Heavy Rains | पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; कोयना, राधानगरीतून पॉवर हाऊससाठी विर्सग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गेले काही दिवस कोकणात मुसळधार पाऊस (Heavy rains) करणार्‍या मॉन्सूनने शुक्रवारी पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रावर (Western Maharashtra) आपली कृपादृष्टी केली. पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा आणि भीमा नदीच्या खोर्‍यातील नद्यांचा पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी जोरदार पाऊस (Heavy rains) झाला आहे. महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे अतिवृष्टी झाला असून गेल्या २४ तासात तेथे २०० मिमी पावसाची (Rain) नोंद झाली आहे. Heavy rains in the dam area of western Maharashtra

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

या पहिल्याच जोरदार पावसामुळे भीमा खोर्‍यातील आंद्रा धरणात सर्वाधिक ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
पवना धरण परिसरात गेल्या २४ तासात १०२ मिमी पाऊस झाला असून धरणात ३२ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) सध्या ६२ टक्के पाणीसाठा आहे.
मुळशी धरण (Mulshi Dam) परिसरात आज सकाळपर्यंत १३४ मिमी, टेमघर ११०, वरसगाव ५१, पानशेत ५६ व खडकवासला ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

डिंभे धरणक्षेत्रात ३९, वडज २४, येडगाव २०, पिंपळगाव जोगे ५५, कळमोडी ७१, चासकमान ४२, भामा आसखेड ५१, वडिवळे ८०, कासारसाई ६४, गुंजवणी ५९, निरा देवधर ७५, भाटघर ३६, वीर २२, नाझरे १९, उजनी धरण क्षेत्रात ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

कृष्णा खोर्‍यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे.
त्यामुळे कोयना, राधानगरी, दुधगंगा, वारणावती, कासारी, पाटगाव या धरणांमधून पॉवर हाऊससाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

कोयना धरणाक्षेत्रात (Koyna Dam) १४३ मिमी, राधानगरी १२७, तुळशी १२६, पाटगाव १२४, कासारी ८३, धोम बलकवडी ११७, धोम ६०, कव्हेर, ४७, वारणावती ५२, उरमोडी ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उरमोडी धरण आजपर्यंत ६३ टक्के भरले आहे. कोयना धरणातही ३२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतीची कामे वेगाने सुरु झाली आहेत.

Web Title : Heavy rains in the dam area of western Maharashtra

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Pune News | अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी मुलालाच इमारतीत डांबले; शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील खळबळजनक प्रकार