पुणे-बंगलुरु महामार्गावर जड वाहतूक सुरु ; कार, छोट्या वाहनांना अजूनही बंदी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे गेल्या आठवड्यापासून बंद असलेला पुणे -बंगलुरु महामार्गावर सोमवारी सकाळपासून जड वाहनांना सोडण्यात सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूरला प्रवेश करणाऱ्या मार्गावर पंचगंगेचे पाणी मोठ्या प्रमाणावर आले होते.

तसेच शिरोली फाट्याजवळ ५ ते ७ फुटाचे पाणी वाहत होते. त्यामुळे गेल्या ६ दिवसांपासून सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. रविवारी सकाळी पाणी कमी झाल्याने एका जेसीबीच्या सरंक्षणात एक दुधाचा टँकर पाण्याने भरलेल्या रस्त्यावरुन नेण्यात आल. टँकरने रस्ता पार केला. परंतु, पाण्यामुळे टँकर हलत असल्याने वाहतूक सुरु करणे धोकादायक वाटल्याने ती बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर रात्री पाणी कमी झाल्याने अगोदर कोल्हापूरसाठी दुध व पेट्रोल, डिझेलचे टँकर रवाना करण्यात आले होते.

सोमवारी सकाळपासून शिरोली फाट्यावरील पाण्याची पातळी आणखी कमी झाल्याने येथून जड वाहनांना विशेषत: ट्रकना सोडण्यास सुरुवात झाली आहे. कराड ते कोल्हापूर या मार्गावर सध्या हजारो ट्रक गेल्या ७ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्याचबरोबर काही ट्रॅव्हल्सच्या गाड्याही अडकल्या आहेत. हे ट्रक आता वाट काढत बेळगावच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. मात्र, कोल्हापूर -पुणे महामार्गावर अजूनही भरपूर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त