
Heavy Vehicles Prohibited on Pune Roads for Ganeshotsava | गणेशोत्सव काळात पुण्यातील ‘या’ 10 रस्त्यांवर जड वाहतूकीला बंदी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Heavy Vehicles Prohibited on Pune Roads for Ganeshotsava | गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक विभागाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन होणारी जड वाहतूक बंद केली आहे. गणेशोत्सव काळात नगरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून या रस्त्यावरुन होणाऱ्या जड वाहनांमुळे नागरिकांच्या जिवीतास धोका होऊ नये यासाठी जड वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Traffic Vijaykumar Magar) यांनी दिली. (Heavy Vehicles Prohibited on Pune Roads for Ganeshotsava)
गणेशोत्सव काळात 16 सप्टेंबर पासून ते गणपती विसर्जना पर्य़ंत पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर जड, अवजड वाहनांना 24 तास बंदी करण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पुणे वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. जड, अवजड वाहतूक बंद केलेले रस्ते खालील प्रमाणे… (Heavy Vehicles Prohibited on Pune Roads for Ganeshotsava)
- लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक
- केळकर रोड – फुटका बुरुज ते अलका चौक
- कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक
- बाजीराव रोड – पुरम चौक ते गाडगीळ पुतळा
- टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक
- शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक
- कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाब चौक
- फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक
- जंगली महाराज रोड – स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
- शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा