Video : साऊथची ‘मलायका’ हीना पांचाळचा बॉलिवूड साँगवर जबरदस्त डान्स !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री हीना पांचाळ (Heena Panchal) हिनं बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. साऊथची मलायका अरोरा (Malaika Arora) म्हणून ओळखली जाणारी हीना पांचाळ आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेतही आली होती. आता एका नव्या व्हिडिओमुळं तिनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओत ती बॉलिवूड साँगवर थिरकताना दिसत आहे.

हिनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूड साँग गरम चाय की प्यालीवर ती थिरकताना दिसत आहे. सध्या तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

हीनाला डान्स खूप आवडतो. डान्स तिची पहिली पसंती आहे. तिची स्टाईल, अदा आणि डान्स स्टेप्स चाहत्यांनाही भावत असतात. याआधीही तिनं असे अनेक डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत जे सोशलवर चर्चेत आले होते.

बॉम्बे टाईम्स मासिकातील टॉप 10 बॉलिवूड आयटम गर्ल्सच्या यादीत हीना सातव्या क्रमांकावर होती. याशिवाय 2015 च्या फोर्ब्स इंडियाच्या यादीतील 100 सेलेब्रिटींमध्ये हीनाचा समावेश होता. हीना अ‍ॅक्ट्रेसऐवजी आयटम गर्ल म्हणून जास्त फेमस आहे. हीना आपल्या फिटनेसला घेऊन खूप जागरूक आहे. मलायकाच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता चेहरा असणारी हीना पांचाळ मलायकाची Look-ALike म्हणून फेमस आहे. मलायकाप्रमाणेच ती फिट आहे. हीना अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल आहे.

हीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिनं अनेक साऊथ सिनेमात आयटम साँग केले आहेत. मोहल्ला, हुक्का, बोगन, राजू ओ राजू, बेबो बेबो असे काही तिचे सिनेमे सांगता येतील.

https://www.instagram.com/p/CGryNMdh5kB/

https://www.instagram.com/p/CGzgBCFBC1Q/

https://www.instagram.com/p/CGIJvnxnK5B/