Helicopter Crashes in Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील चोपडा शिवारात हेलिकॉप्टर कोसळले; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी

जळगाव न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात वनक्षेत्रात हेलिकॉप्टर (Helicopter Crash in Jalgaon) दुर्घटना झाली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट (Female pilot) गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रशासनाचे पथक तातडीने रवाना झाले असून अद्याप पूर्ण माहिती स्पष्ट झालेली नाही. ही दुर्घटना आज (शुक्रवार) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crash in Jalgaon) आहे तो जंगल परिसर आहे. त्यामुळे त्याठिकाणी मदतकार्य पोहचण्यास अडचणी येत आहेत.

चोपडा तालुक्यातील वर्डी शिवार असलेला भाग हा आदिवासी परिसर आहे.
सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात ही घटना घडील आहे.
दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान (Trainee aircraft) आहे ही माहिती अद्याप समजू शकली नाही. परंतु हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
यामध्ये दोन जणांचा मृत्यू (Death) झाला तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.
आदिवासी परिसर असल्याने तेथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टर मधील महिला पायलटला जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले.
घटनेची माहिती मिळताच चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी रवाना झाले आहेत.

दुर्घटना घडली ते ठिकाण जंगलात आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी काही किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे अवघड झाले आहे.
तरी देखील बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून (district administration) देण्यात आली आहे.

Web Title : Helicopter Crashes in Jalgaon | helicopter crashes in chopda in jalgaon district fear of death of two

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Jalgaon News । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन गटात हाणामारी

Woman With 2 Vaginas | अनेक वर्षापासून पीरियड्स लीकेजच्या समस्येने त्रस्त होती महिला, डॉक्टरांनी पहाताच सांगितले 25 वर्ष ’दडलेले’ सत्य

Pune Crime | प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरूम-बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा लावणार्‍या एमडी डॉक्टर सुजित जगतापला जामिन