गॅसच्या फुग्यांचा स्फोट, 3 जखमी

म्हैसूर : वृत्तसंस्था – आनंदाच्या क्षणी अनेकांना आकाशात फुगे सोडण्याची आवड असते. वाढदिवस, सण-उत्सवातही मोठ्या संख्येने आकाशात फुगे सोडले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फुग्याबद्दल आकर्षण असते. परंतु कोणत्या गोष्टीचा कधी काय परिणाम होईल हे काही सांगता येत नाही. बऱ्याचदा लोक करायला जातात एक आणि घडते भलतेच काही. असाच काही प्रकार समोर आला आहे. आकाशात फुगे सोडणे म्हैसूरमध्ये काही जणांना चांगलेच भोवल्याचे दिसत आहे.

म्हैसूर येथील सुत्तूर मठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यज्ञयागही सुरू असल्याचे दिसत होते. याचवेळी तेथे आकाशात सोडण्यासाठी अनेक फुगे आणले होते. तसेच यज्ञयाग सुरू असताना फुगे आकाशात सोडण्याची तयारी सुरू होती. एवढ्यात त्या फुग्यांनी अचानक पेट घेतल्याचे दिसून आले. पेटलेल्या फुग्यांचा स्फोट झाला. या घटनेमध्ये 3 जण जखमी झाल्याचे समजत आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अचानक घडलेल्या घटनेने जमलेली मंडळी

नेमकं काय घडलं ?

सुत्तूर मठात सुरू असलेल्या कार्यक्रमात यज्ञ सुरु होता. यावेळी आकाशात सोडण्यासाठी फुगेही आणले होते. आकाशात सोडल्या जाणाऱ्या या फुग्यांमध्ये हेलियम असते. सदर फुगे हातात घेऊन यज्ञाच्या शेजारीच अनेक मंडळी मोठ्या उत्साहात उभी होती. परंतु जवळच सुरू असणाऱ्या यज्ञाची हाय फुग्यांना लागली आणि या फुग्यांनी अचानक पेट घेतला आणि फुग्यांचा स्फोट झाला.