home page top 1

..म्हणून पुण्यातील ‘त्यांनी’ मुलाच्या दशक्रिया विधी दरम्यान केले ‘हेल्मेट’ वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाच्या तिरडीला खांदा देण्याची वेळ बापावर कधी येऊ नये, असे म्हणतात. मेदनकरवाडीतील किरण मेदनकर यांच्यावर हा दु:खद प्रसंग ओढविला. तेव्हा त्यांनी असा प्रसंग पुन्हा दुसऱ्यावर येऊ नये, यासाठी मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात नागरिकांना मोफत हेल्मेटचे वाटप केले.

त्यांचा मुलगा दिग्विजय किरण मेदनकर (वय २२) याचा गेल्या आठवड्यात पुण्यात अपघाती मृत्यु झाला होता. दिग्विजय हा पुणे येथे बी. ई. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. गेल्या आठवड्यात त्याचा दुचाकीवरून पडून गंभीर जखमी होवून मृत्यू झाला होता. गाडी चालविताना दिग्विजय याच्या डोक्यात हेल्मेट असते, तर नक्कीच त्याचा जीव वाचला असता. त्यामुळे अशी वेळ अन्य कोणावरही येवू नये, यासाठी मेदनकर यांनी चाकण लायन्स क्लबच्या माध्यमातून नागरिकांना हेल्मेटचे वाटप केले.

किरण मेदनकर यांनी सांगितले की, दिग्विजय हा आमचा जीव की प्राण होता. त्याच्या अपघाती मृत्यूने आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकी चालविताना त्याच्या डोक्यात हेल्मेट असते, तर हा प्रसंग त्याच्यावर ओढवला नसता. ही वेळ अन्य कोणावरही येऊ नये, यासाठी आम्ही हेल्मेट वाटप केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी
किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट
शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

Loading...
You might also like