हिंजवडीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्वांची मदत महत्वाची : पद्मनाभन

पिंपरी | पोलिसनामा ऑनलाईन

आयटी पार्क मधील वाहतूक समस्या कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी प्रयत्नशील आहेत. वेगवेगळे प्रयोग राबवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मिटिंग घेऊन यावर कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा केली. हिंजवडीमधील वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला असून तो सोडविण्यासाठी सर्वांची मदत गरजेची असल्याचे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सव काळातील दारूबंदीला स्थगिती
हिंजवडी मधील हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या सभागृहात आयुक्तांनी हिंजवडी मधील आयटीयन्सशी संवाद साधला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B074G3TJYF,B01F7AX9ZA,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93553f0a-b64b-11e8-bfa2-9df64e456c6d’]
एका कारमध्ये किमान दोन प्रवासी असावेत, रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे, वाहतुकीची शिस्त पाळायला हवी, बंद पडलेल्या वाहनांसाठी ठराविक अंतरावर टो-व्हॅन असावी, नागरिकांसोबत सुसंवाद वाढवायला हवा, हिंजवडीकडे येणा-या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करावे, रस्त्यावरील बस थांबे मागे घ्यावेत, त्यामुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही, आवश्यक त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग करावे,  डी मार्ट, वाईन शॉप समोरील वाहनांना थांबू देऊ नये यावर चर्चा झाली.
बस स्थानकात चोरी करणारे सिसिटीव्हीत कैद;महिला वाहकाची पर्स केली लंपास
आयुक्त पद्मानाभन म्हणाले की, समस्या भरपूर असतात. पण त्या योग्य ठिकाणी मांडायला हव्यात. समूहात समस्या विचारल्यास कोणीही समस्या सांगत नाही. पण वैयक्तिक विचारल्यास प्रत्येकजण समस्या सांगतो. आपल्या अडचणी एकमेकांशी शेअर करा. जबाबदा-या ओळखा आणि नियम पाळा, त्यामुळे प्रशासनातही सुधारणा होतात. हिंजवडी सध्या वाहतुकीच्या समस्येने ग्रासली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे महत्वाचे आहे.