पुण्यातील ‘ब्लू स्प्रिंग्ज् हौसिंग सोसायटी’कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर-सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. लाखो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी ब्लू स्प्रिंग्ज् हौसिंग सोसायटी, आंबेगाव खुर्द, पुणे यांच्यामार्फत मदत करण्यात आली आहे.

त्याला भरघोस प्रतिसाद देखील मिळाला. या कामासाठी सोसायटीमधील सभासद व त्यांचे मित्रमंडळ, नातेवाईक यांच्याकडून निधी गोळा करण्यात आला. शनिवार दि. २४ आॕगस्ट रोजी सोसायटीमधील सदस्यांनी पूरग्रस्त भागातील पूरबाधितांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना हा निधी स्वाधीन केला.

दुधगाव (तालुका – मिरज, सांगली), दानोळी, अर्जुनवाड (तालुका – शिरोळ, कोल्हापूर), चंदूर, इंगळी (तालुका – हातकणंगले, कोल्हापूर) व खोतवाडी (तालुका – पन्हाळा, कोल्हापूर) येथील साधारणपणे ३५ गरीब, अल्पभूधारक पूरग्रस्त कुटुंबियांना धान्य व रोख रक्कम या स्वरूपात मदत देण्यात आली. साफसफाई, रोगराई निवारण, पडलेल्या घरांची पुनर्बांधणी या कामासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याचे सोसायटी प्रतिनिधींनी सांगितले.

या कामासाठी सोसायटीतील सदस्यांबरोबरच देशात व परदेशात असणाऱ्या मित्रमंडळींकडून भरघोस निधी मिळाल्याचे प्रतिनिधींनी नमूद केले. पुरामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकासह उध्वस्त झाला आहे. ही मदत कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी प्रेरणादायी ठरली.

आरोग्यविषयक वृत्त –