शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी मदत करा : संभाजी भिडे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रायगडावर सोन्याचे सिंहासन करण्यात येणार असून हे  सिंहासन पूर्ण करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडेंनी शहरातील धारकऱ्यांशी यासंदभात संवाद साधताना हे आवाहन केले. मदतीसाठी शहरात ४ तुकड्या तयार करण्यात येणार आहेत.

[amazon_link asins=’B009WNA9V6,B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’35f239df-ae7a-11e8-8cc4-a3c2bd1247b3′]

रायगडावरील सोन्याच्या सिंहासनासंदर्भात संभाजी भिडे यांनी नगर शहरातील धारकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले. १ जून २०१७ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांसाठी सोन्याचे सिंहासन तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी संभाजी भिडे राज्यभर फिरत आहेत. तसेच सिंहासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सिंहासनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अहमदनगर शहरात ४ तुकड्या तयार करण्यात येणार असून त्येक तुकडीत २००० लोकांचा समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बैठकीदरम्यान शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उदयनराजेंकडून बापट यांना साताऱ्यातून खासदारकीची ऑफर

जाहिरात