वचनपूर्ती ! नवे दप्तर, वह्या, पेन पाहून ‘त्यांचे’ चेहरे फुलले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महापुराची मनात बसलेली धास्ती आणि पूर ओसरल्यानंतर वाहून गेलेला संसार उभा करताना आई-वडिलांची कसरत, मग पुराच्या पाण्यात वाहून गेलेले व भिजलेले दप्तर, शालेय साहित्यविना शाळेत जाणाऱ्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या हाती जेव्हा नवे दप्तरासह शालेय साहित्य पडले तेव्हा त्यांचे चेहरे आनंदाने फुलले. इतकेच नाहीतर संकटे कोणतेही येऊ द्या, भविष्यात आमचेही हात मदतीसाठी कणखर असतील, हे भावही त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.
Help-Riders-Group

Help-Riders-Group1
पुण्यात वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग करून देणाऱ्या हेल्प रायडर्स गटाकडून महापुराचा फटका बसलेल्या सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील पुनदी गावासह नागराळे, बुर्ली, आमनापूर या गावातील शाळांमधील साडेसातशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी नव्या दप्तरासह कंपासपेटी, वह्या, रंगपेटी, पेन, पेन्सिल आदी साहित्य माध्यमिक व प्राथमिक अशी वर्गवारी करून शाळांच्या पटसंख्येनुसार नुकतेच प्रदान करण्यात आली.
Help-riders-Group2

Help-Riders-Group4
पुराच्यावेळी हेल्प रायडर्स गटाकडून डॉक्टरांच्या पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे वैद्यकीय सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या गावांमध्ये दोन दिवस केला होता. त्यावेळी पूर ओसरल्यानंतर पुनदी गावात शिवानी व पृथ्वीराज लोहार ही भावंडे पलंगावर भिजलेले शालेय साहित्य वाळवताना हेल्प रायडर्सच्या सदस्यांना आढळून आली होती. त्यावेळी या भावंडाना शैक्षणिक साहित्य देण्याचे वचन देऊन हे गाव हेल्प रायडर्सने शैक्षणिक साहित्य सहकार्यासाठी दत्तक घेतले होते. वचनपूर्ती करताना एका गावावरून सात गावांचे नियोजन झाले आणि पूरग्रस्त ७५० विद्यार्थ्यांना नवे दप्तर, वह्या, आदी शैक्षणिक साहित्यांचे किट मिळाल्याने त्यांना भेडसावणारी चिंताही मिटली आहे. पुढील ३ वर्षे या गावांमध्ये शैक्षणिक सहकार्य अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात येणार असून लवकरच तीन गावांमध्येही साहित्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे हेल्प रायडर्सचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया, सुदीन जायाप्पा, प्रवीण पगारे, सचिन पवार, अजित जाधव यांनी सांगितले.
Help-Riders-Group-6

Help-Riders-Group-7

या शैक्षणिक साहित्य सहकार्यासाठी व्हिन्सेस आयटीचे उमेश थरकुडे, विशाल नलावडे, लायन्स क्लबच्या नंदा पंडित आणि पलूसचे प्रमोद देशमुख, डॉ प्रमोद देशमुख, मुख्याध्यापक विश्वास पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. हेल्प रायडर्सचे पदाधिकारी संतोष पोळ, श्रीकांत कापसे, शुभम शितोळे, प्रशांत महानवर, बाळा अहिवळे, सचिन ननावरे, संदीप कुदळे, राहुल वाघवले, बाळासाहेब ढमाले, विनायक मुरुडकर, अनुपम शहा, श्रीकांत कुंबरे, बाळासाहेब जगताप, ओमकार रासकर, महेश चिले, प्रसाद गोखले यांनी नियोजन केले. तसेच औरंगाबाद हेल्प रायडर्सच्यावतीने पुनदी गावातील पूरग्रस्त २५१घरांना संसारोपयोगी साहित्यही संदीप कुलकर्णी, अक्षय बाहेती व सदस्यांकडून देण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –