डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गरजूंना मदत करावी : शशिकला वाघमारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना महामारीचे संकट गडद होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी न करता साध्या पद्धतीने करून गरजूंना मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. रक्तदान, प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे शहर अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी व्यक्त केले.

हडपसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि रिपाइंच्या महिला शहराध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक मारुती तुपे, नगरसेवक योगेश ससाणे, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, युवा नेते आशिष आल्हाट, नगरसेविका वैशाली बनकर, महेश ससाणे, अमित गायकवाड, संजय सातव, शैलेश आल्हाट, बाबू गायकवाड, सुफीयान खान, बबन पवार, मुकेश बंडू सोनवणे, रविंद्र जगताप, प्रमोद सातव, भाऊ ननावरे, प्रशांत बोगम, इम्तियाज मेमन, अक्षय बहिरट, संतोष खरात, आकाश गायकवाड, सुनीता गायकवाड, शांताबाई गवळी, मंगल अंकुश, सुमन शिंदे, पूजा शिंदे, रुपाली आदमाने, वैशाली शिंदे, सुनीता शिंदे, मीनाझ मेमन, लक्ष्मी गायकवाड, रोहित पवार, सुमेर परदेशी, संतोष काटम, अनिल बाबू माने, विजय बिस्ट, श्याम टिंटोरे आदी मान्यवर उपस्थित होते.