‘तिला’ पाहण्यासाठी ‘ड्रीम’ गर्ल हेमा मालिनी आणि धमेंद्र हॉस्पीटलमध्ये !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध स्टार कपल हेमा मालिनी आणि धमेंद्र यांची मुलगी ईशा देओल दुसरी वेळ आई झाली आहे. ईशाने १० जूनला मुलीला जन्म दिला. ईशाने आपल्या इन्स्टाग्रामवर मुलीच्या जन्माची बातमी आणि त्याचबरोबर एक पोस्ट केली आहे.

आजी-आजोबा हेमा आणि धमेंद्र नुकतेच नातीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले. या बॉलिवूड कपलच्या जोडीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ईशा देओल आणि भरत तखतानी यांच्या पहिल्या मुलीचे नाव राध्या आहे.

दोन मुलीची आई ईशाला भेटायला आलेले तिचे आई-वडिल छोट्या नातीला भेटायला हॉस्पिटलला पोहचले. यांचा फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर वीरल भाययानी यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर हेमा मालिनी आणि धमेंद्र यांचा फोटो शेअर केला आहे.

त्याचबरोबर ईशाने देखील आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन लिहले की, ‘प्रेम आणि प्रार्थनेसाठी सगळ्यांचे खूप आभार’

ईशा आणि भरतने २०१० मध्ये लग्न केले होते. आपल्या लग्नाला ५ वर्ष झाल्यानंतर ईशाने राध्याला जन्म दिला. पहिल्या प्रेग्नेंसीच्यावेळी ईशा म्हणाली की, माझ्या मुलीसाठी आई हेमा मालिनी आणि बहिण अहानाचा खूप सपोर्ट मिळाला.

हेमा आणि धमेंद्र तिसरी वेळ आजी-आजोबा बनले आहे. हेमा मालिनीची छोटी मुलगी अहाना देओलने ११ जून २०१५ ला मुलगा डेरिन वोहराला जन्म दिला होता.

आरोग्य विषयक वृत्त –

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

Loading...
You might also like