Birthday SPL : खूपच ‘फिल्मी’ आहे हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या न झालेल्या लग्नाची गोष्ट

पोलिसनामा ऑनलाइन – आज ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचा वाढदिवस आहे. 70-80 च्या दशकात ड्रीमगर्ल म्हणून त्या नावारूपास आल्या. वयाच्या 14 वर्षीच त्यांनी फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आपल्या सौंदर्य आणि अदाकारीनं त्यांनी अशी जादू केली की, पहिल्याच सिनेमानंतर त्यांच्याकडे दिग्दर्शकांची रांग लागली.

1961 साली हेमा यांचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचं नाव होतं पांडव वनवास. या तेलगूल सिनेमा हेमा यांनी एका नर्तकाची भूमिका साकारली होती. सपनों का सौदागार या सिनेमातून हेमा यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. 1968 मध्ये आलेल्या या सिनेमातून हेमा मालिनी राज कपूर यांच्या हिरोईन होत्या. हेमा मालिनींचं वय होतं 20 वर्षे आणि राज कपूर त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी मोठे होते.

हेमा यांच्या सौंदर्यावर धर्मेंद्र फिदा होते. परंतु त्यांच्याशिवाय जितेंद्र आणि संजीव कुमार हेही रांगेत होते. गंमत अशी की, जितेंद्र यांच्यासोबत हेमा यांचं लग्न होणार होतं. परंतु हे लग्न म्हणजे जबरदस्तीचा मामला होता.

हेमा मालिनी यांच्या बियॉंड ड्रीमगर्ल या आत्मवृत्तात लिहिल्याप्रमाणं धर्मेंद्र आणि हेमा यांचं प्रेम प्रकरण हेमाची आई जया चक्रवर्ती यांना पसंत नव्हतं. कारण धर्मेंद्र विवाहित होते आणि त्यांना 3 मुलंही होती. दोघांना करण्यासाठी आई जया यांनी जितेंद्र सोबत हेमाचं लग्न लावण्याचा विचार केला.

हेमाच्या आईनं हेमाचं मन वळवलं आणि जितेंद्रच्या आईवडिलांना भेटायला सांगितलं. ते या लग्नासाठी तयार होते. आईसाठी हेमा लग्नाला तयार झाल्या.

गुपचूप लग्न लावण्यासाठी घरचे सगळे चेन्नईला पोहोचले. लग्नाची बातमी गुप्त ठेवूनही लीक झाली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आली. बातमी पाहून धर्मेंद्रचा पारा चढला आणि ते शोभा सिप्पी (जितेंद्रची बालमैत्रीण) यांना घेऊन फ्लाईटनं चेन्नईला गेले.

कसंतरी करून धर्मेंद्र हेमाला एकांतात भेटले आणि त्यांना हे लग्न न करण्यासाठी सांगितलं. हेमाचे वडिल खूप चिडले होते. परंतु दारूच्या नशेत असणारे धर्मेंद्र कोणाचंच ऐकेना. गोंधळलेल्या हेमा यांनी लग्न पुढे ढकलण्यास सांगितलं. जितेंद्र आणि त्यांच्या घरचे खूप संतापले होते. यानंत जितेंद्र कुटंबाला घेऊन तिथून निघून गेले.

यानंतर 18 ऑक्टोबर 1974 रोजी शोभा सिप्पी यांच्यासोबत जितेंद्र विवाहबद्ध झाले. त्यांना दोन मुलं आहे. एक म्हणजे टीव्हीची क्वीन एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूर. अर्थात हेमा यांनीही घरच्यांना डावलून धर्मेंद्र याच्याशी लग्न केलं.