Hema Malini | शिवसेना नेते गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधानावर थेट हेमा मालिनींनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hema Malini | नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जळगावमध्ये शिवसेनेचे नेते (Shiv Sena) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका वक्तव्यामुळे प्रंचड गदारोळ निर्माण झाला. रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालांशी केली होती. यामुळे भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर खुद्द हेमा मालिनी यांनी या वक्तव्यावरुन उत्तर दिलं आहे.

 

हेमा मलिनी (Hema Malini) म्हणाल्या, ‘मला माझे गाल प्रॉपरली आणि सेफली ठेवावे लागतील, असे म्हणत हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानावर मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली आहे. लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड सुरू केला होता. त्यामुळे, त्यांना वाटलं असेल असं काही, पण महिलांबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे. मला या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर टीका करताना, मागील 30 वर्ष ते या भागातील आमदार आहेत.
पण ते चांगले रस्ते करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत,
असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानावर आता निषेध व्यक्त केला जात आहे.

 

 

Web Title :- Hema Malini | hema malini responded directly controversial statement shivsena minister gulabrao patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepika Padukone Bold Bikini Photo | दीपिकानं बिकिनी घालून केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर रंगल्या तुफान चर्चा

Pune Crime | पुणे शहरात जातपंचायतीच्या 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल, बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं

Hrishikesh Kanitkar | पाकिस्तान विरूध्द एक चौकार मारल्यानं बनला ‘हा’ क्रिकेटर हिरो; आता टीम इंडियाला देणार कोचिंग