धर्मेंद्र नव्हे तर ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात पागल होत्या हेमा मालिनी आधीपासूनच करायचं होतं लग्न ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. धर्मेंद्र यांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्या दर्जेदार अभिनयाबाबत आजही बोललं जातं. बंदिनी या सिनेमातून धर्मेंद्र प्रकाशझोतात आले होते.

धर्मेंद्र अवघ्या 19 वर्षांचे असतानाच त्यांचा विवाह झाला होता. प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न लावण्यात आलं होतं. त्यांना चार मुले होती. सनी, बॉबी, अजीता, विजेता अशी त्यांची नावे आहेत. प्रकाश कौर ही त्यांच्या आईची पसंत होती. त्यानंतर 1975 साली हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. नंतर काही वर्षांनी त्यांनी लग्नही केलं. त्यांना दोन मुली आहेत. ईशा आणि अहाना अशी त्यांची नावं आहेत.

https://twitter.com/30Kumaar/status/1270249218515574786?s=20

तुम्हाला हे माहिती नसेल की धर्मेंद्र यांच्या आधी हेमा मालिनी यांची पसंती काही औरच होती. त्या माणसाचे फोटो त्यांनी रूममध्ये देखील लावले होते. हेमा त्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. कोणी जर विचारलं की, तू कोणासोब लग्न करणार हेमा या माणसाचं नाव घेत असत.

https://twitter.com/30Kumaar/status/1270249410081980419?s=20

परंतु कालांतरानं त्यांच्या लक्षात आलं की, आपलं त्या व्यक्तीशी लग्न होणार नाही. कारण तो एक देव आहे आणि या देवाचं नाव आहे श्रीकृष्ण. हेमा श्रीकृष्णाच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. आजही हेमा कृष्णभक्त आहेत. त्यांचा बंगलाही त्यांनी राधा कृष्ण मंदिराच्या बाजूला घेतला आहे. तिथं जाऊन त्या रोज श्रीकृष्णाची पूजा करतात.

https://www.instagram.com/p/Braks0BAUCR/

हेमा मालिनी यांची बियोंड द ड्रीम्स ही आत्मकथा अलीकडेच प्रकाशित झाली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

https://www.instagram.com/p/BraldBFA7JM/

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 1970 च्या दशकात एकत्र काम करायला सुरुवात केली. 1970 साली आलेल्या तम हसीन मै जवां या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. आतापर्यंत त्यांनी 28 सिनेमात एकत्र काम केलं आहे. 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं.