काय सांगता ! होय, ‘या’ कारणामुळं 1 वर्षापासून धर्मेंद्र यांना भेटल्या नाहीत हेमा मालिनी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा धोका अजूनही कायम आहे. यामुळे अनेक लोकांना एकमेकांपासून नाईलाजाने दूर रहावे लागत आहे. फेस मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला प्रत्येकाला दिला जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र सुद्धा एक वर्षापेक्षा जास्त काळापासून वेगळे रहात आहेत. कोरोना व्हायरसचा धोका वाढताच धर्मेंद्र मुंबईच्या बाहेर फार्महाऊसवर राहण्यासाठी गेले.

स्पॉटबॉयशी बोलताना हेमा मालिनी यांनी सांगितले की, हे त्यांच्या सुरक्षेसाठी चांगले आहे. आम्ही सध्या सोबत राहण्यापेक्षा त्यांच्या आरोग्याचा जास्त विचार करत आहोत. आपण सर्वात वाईट संकटातून जात आहोत.

जर आपली संस्कृती वाचवायची असेल तर आपल्याला मजबूत व्हावे लागेल, जरी मोठे बलिदान द्यावे लागले तरी चालेल.

धर्मेंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असतात. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी म्हटले होते की, मी सर्वांना व्हॅक्सीन घेण्याची विनंती करतो. विशेषकरून ज्येष्ठांना. कोरोनाला रोखायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंग आणि व्हॅक्सीनेशनच उपाय आहे. लोकांना मास्क घातलेले पाहून मला खुप दुख होते.

धर्मेंद्र आणि हेमाच्या लव्ह स्टोरीबाबत बोलायचे तर ती एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. हेमा, यांचे धर्मेंद्र यांच्यावर प्रेम होते. धर्मेंद्र विवाहित असल्याने हेमा यांच्या घरातील तयार नव्हते की, हेमाने त्यांच्याशी लग्न करावे. धर्मेंद्र यांना सुद्धा आपली पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट देऊन हेमाशी लग्न करायचे होते.

असे म्हटले जाते की, धर्मेंद्र यांच्या पत्नीने घटस्फोटाला नकार दिला होता, यासाठी धर्मेंद्र यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. जेणेकरून ते हेमाशी लग्न करू शकतील. अखेर 1980 मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा विवाह झाला.