‘तो’ फोटो शेअर केला आणि हेमा मालिनी ट्रोल झाल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी सध्या त्यांच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. हेमा मालिनी यांनी वृद्ध महिलेसोबत फोटो काढला आहे. या महिलेच्या डोक्यावर जाळण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडं दिसत आहेत. या फोटोमुळे त्या ट्रोल होताना दिसत आहेत.

सोशलवर हा फोटो व्हारल झाल्यानंतर अनेकांनी हेमा मालिनी यांना ट्रोल करत त्यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले आहे. तुम्ही जर उज्वला योजना घरोघरी पोहोचवली आहे तर मग या महिलेला अजून चूल का पेटवावी लागत आहे ? असा सवालही एक युजरने विचारला आहे. हेमा मालिनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. कधी त्या शेतात काम करताना दिसतात कर कधी त्या ट्रॅक्टर चालवतानाही दिसून येतात. सध्या मात्र त्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.

संबित पात्रा के बाद हेमा मालिनी जी भी "उज्वला योजना" की पोल खोलती हुयी !

Kanhiya Lal Teja Bhai ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 7, 2019

काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हेदेखील सोशलवर ट्रोल झाले होते. त्यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात संबित पात्रा एके ठिकाणी जेवत आहेत. पंरतु तेथील जेवणे देणारी ती गरिब महिला चुलीवर जेवण बनवत आहे. यावेळी काँग्रेसने उज्वला योजनेवर टीका करत त्यांन घेरलं होतं.

मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका ठिकाणी ते जेवत होते आणि एक गरिब महिला चुलीवर जेवन बनवत होती. यावेळी देखील काँग्रेसने उज्वला योजनेवरुन त्यांना घेरलं होतं. शिवाय सोशलवरही अनेकांनी त्यांना ट्रोल केलं होतं.

You might also like