प्रियांका गांधींवर कमेंट केल्याने भडकल्या हेमा मालिनी 

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – प्रियांका गांधी यांची काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. राजकारणात सक्रिय झाल्यापासून सर्वत्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यासह काँग्रेसवर वादग्रस्त वक्तव्ये केली. जास्त करुन प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यावरुन भाजपाच्या नेत्यांनी टिप्पणी केली आहे. नेमकं हेच भाजप खासदार हेमा मालिनी यांना खटकलं. त्यांनी यावरून भाजप नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. प्रियांकांवर टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांनी झोडपून काढलं. राजकारणात अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांना थारा नाही, असं त्या म्हणाल्या.

‘या’ नेत्याने केली होती प्रियांका गांधींवर कमेंट
भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. कैलास विजयवर्गीय म्हणाले की, ‘काँग्रेसकडे चेहरेच उरले नाहीत म्हणून त्यांच्याकडून आता ‘चॉकलेट फेस’ समोर आणले जात आहेत. हे वक्तव्य हेमा मालिनी यांना पटलेलं नाही. त्या म्हणाल्या, की ‘अनेक सुंदर महिला राजकारणात सक्रिय आहेत. पण म्हणून कुणाच्या दिसण्यावर  करण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यावर अशा प्रकारे टीका करण्याची आवश्यकता नाही, असंही त्या म्हणाल्या.

अभिनेत्रीला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात – हेमा मालिनी
भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी प्रियांकांना ‘चॉकलेट फेस’ म्हणून संबोधलं होतं. त्यांचं हे वक्तव्य हेमा मालिनी यांना रुचलं नाही. त्या म्हणाल्या, की ‘अनेक सुंदर महिलांनी राजकारणात पाऊल टाकलं आहे. पण म्हणून कुणाच्या दिसण्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही.’ काँग्रेसनंही हेमा मालिनींच्या नृत्य सादरीकरणावर टिप्पणी केली होती. त्यावर अशा प्रकारे टीका करण्याची आवश्यकता नाही, चित्रपटसृष्टीतील स्टार असल्यानं किंवा सुंदर चेहऱ्यामुळं मतदार आकर्षित होतात का, या प्रश्नावरही त्यांनी रोखठोक उत्तर दिलं. ‘अभिनेता किंवा अभिनेत्रीला पाहण्यासाठी लोक गर्दी करू शकतात, पण चेहरा पाहून मतदान करत नाहीत,’ असं असंही त्या म्हणाल्या.