Video : हेमांगी कवीला मुंबईत मिळालं ‘घरकुल’ ! ‘म्हाडा’मध्ये सलग 8 वर्षे प्रयत्न केल्यानंतर लागली लॉटरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिनं यावेळची दिवाळी ही तिच्या मुंबईतील हक्काच्या घरात साजरी केली. त्यामुळं ही दिवाळी हेमांगी कवीसाठी अधिकच खास ठरताना दिसली. हेमांगीनं तिच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशलवर शेअर केले आहेत.

हेमांगीनं घराचे फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. नव्या नवलाईनं गृहप्रवेश हो झाला, असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणं आमच्यासारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून म्हाडामध्ये सलग 8 वर्षे प्रयत्न केल्यानंतर 2016 मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हाला घर लाभलं असंही ती म्हणाली आहे. 2019 मध्ये तिला घराचा ताबा मिळाला आहे.

हेमांगी कवी आजवर भाड्याच्या घरात राहत होती. कधी ती दादर तर कधी दहिसर येथे राहिली आहे. आता तिला तिचं हक्काच घर लाभलं आहे.

हेमांगीनं पती संदीप धुमाळ सोबत नवीन हक्काच्या घरात तिची दिवाळी साजरी केली आहे. संदीप सिनेमॅटोग्राफर आहे.

हेमांगीनं शेअर केलेल्या फोटोत तिचा आनंद स्पष्ट दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनीही नव्या घराबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे.