Hemant Birje | बॉलीवूडचे ‘टार्जन’ हेमंत बिर्जेच्या कारला ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर अपघात; बिर्जे व पत्नी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Hemant Birje | मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Expressway) बॉलिवूडचा ‘टार्जन’ हेमंत बिर्जे (Hemant Birje) याच्या कारला अपघात झाला असून त्यात तो व त्याची पत्नी जखमी झाले आहेत.

१९८५ मध्ये आलेल्या ‘एडव्हेंचर्स ऑफ टार्जन’ या चित्रपटामुळे हेमंत बिर्जे (Hemant Birje) हा रात्रोरात्र स्टार झाला होता. बॉलीवूडमध्ये तो टारझन या नावाने ओळखला जातो.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत बिर्जे, त्याची पत्नी व मुलगी असे तिघे जण कारने जात होते. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुंबई -पुणे एक्सप्रेस महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळ (Urse Toll Naka) त्याची कार दुभाजकाला जाऊन धडकली. त्यात दोघे जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्या मुलीला काहीही झाले नाही. बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला जवळच्या पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Hemant Birje | hemant birje met with an accident on Mumbai Pune Expressway wife injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात