Hemant Dhome | हेमंत ढोमेनी बायकोसाठी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नुकताच ‘सनी’ या चित्रपटामुळे दिग्दर्शक अभिनेता लेखक निर्माता म्हणून हेमंत ढोमेने (Hemant Dhome) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. हेमंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतो. त्याचे अनेक पोस्ट आणि व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच वायरल होत असतात. हेमंतने (Hemant Dhome) नुकतीच बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. आज क्षिती जोग तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने हेमंतने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

 

हेमंतने Instagram वर क्षितीचा आणि त्याचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “चाळीशीचा चष्मा लागला पण तुमचं वय काही वाढत नाहीये. पाटलीण बाई तुम्ही आमच्या बरोबर म्हाताऱ्या होताय हे लय भारी वालं फिलींग आहे! तुम्हाला आवडत नसलं तरी!” सध्या हेमंतची ही पोस्ट सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

 

सध्या हेमंतच्या (Hemant Dhome) या पोस्टला अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
अनेकांनी कमेंट करत क्षितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्षितीदेखील एक उत्तम अभिनेत्री आहे.
तिने आजवर मराठी आणि हिंदीमधून प्रेक्षकाच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

 

 

 

Web Title :- Hemant Dhome | marathi actor hemant dhome special post for wife kshithi jog

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा