Hemant Dhome | ‘या’ दोन मराठी चित्रपटाचे शो रद्द केल्याने मनसेचा मल्टिप्लेक्स चालकांना इशारा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Hemant Dhome | एकीकडे बॉलीवूड चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत असताना मात्र मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच दणका मारत असल्याचे दिसत आहे. सध्या ‘गोदावरी’ (Godavari) आणि ‘सनी’ (Sunny) हे दोन्ही मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला पडल्याचे पाहायला मिळत आहे.पण अशातच मल्टिप्लेक्स चालक मात्र या चित्रपटाचे शो रद्द करत असल्याचे कल्याण मध्ये पाहायला मिळाले. याबाबतची तक्रार काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर केल्यानंतर सनी चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. तर मनसेचे (MNS) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी मल्टिप्लेक्स चालकांना चांगलाच इशारा दिला आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट करत चित्रपटगृह चालकांना चांगलाच इशारा दिला आहे. खोपकर यांनी म्हटले की, “आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला गोदावरी आणि प्रेक्षकांची चांगली गर्दी खेचत असलेला सनी या दोन्ही चित्रपटांचे शो सोमवारी कमी झाले, हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे. लोकप्रिय आणि चांगल्या कलाकृतींना बळ देणं हे गरजेचे आहे. सनी चित्रपटाला किती गर्दी होते हे सोशल मीडियामधील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असूनही मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करतात. म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे”. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होताना दिसत आहे.

तर या आधीच दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी देखील ट्विट करून संताप व्यक्त केला होता.
हेमंत ढोमेने आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले होते की, “आपल्या अजून एक प्रेक्षकांबरोबर ही चुकीचा प्रकार घडला.
तिकीट काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल झाल्याचा एसएमएस त्याला मिळाला एवढेच नाही तर दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवले की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक चित्रपट पाहायला जात नाहीत?” असेही त्यांनी म्हटले आहे.
तरी आधी देखील अनेक प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत करून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने चित्रपटाचा शो कॅन्सल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
त्यावरून संतापलेल्या प्रेक्षकांनी पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट केले होते.
सध्या सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.

 

Web Title :- Hemant Dome | mns amey khopkar warns multiplex owners cancelled sunny and godavari marathi movies show

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना