Hemant Godse | ‘एक मच्छर आदमी को…’ हेमंत गोडसेंचे संजय राऊतांना जशास तसे उत्तर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी हेमंत गोडसेंचा (Hemant Godse) खरपूस समाचार घेतला होता. राऊत गोडसेंना मच्छर म्हणाले होते. त्याला गोडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. एक मच्छर आदमी को xxx बना देता है. त्यामुळे मच्छर काय करू शकतो, हे राऊतांना दाखवून देऊ, असे हेमंत गोडसे (Hemant Godse) म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी नाशिकमधील हेमंत गोडसे आणि इतर 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर गोडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कोणीही कितीही टीका केल्या, तरी आम्ही आमचे काम करत राहणार आहोत. इतरांनी केलेल्या टीकांना उत्तरे देत बसण्यापेक्षा आम्ही कामाला महत्व देतो. त्यामुळे आम्ही कमी बोलतो आणि जास्त काम करतो. संजय राऊतांनी आम्हाला मच्छरांची उपमा दिली. तर मी त्यांना सांगू इच्छीतो की, नाना पाटेकरांच्या यशवंत चित्रपटात एक संवाद आहे, ‘साला, एक मच्छर आदमी को xxx बना देता है’. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यामुळे आम्ही काय करू शकतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे गोडसे म्हणाले.

तसेच संजय राऊतांना कदाचित माहीत नाही की, मच्छर चावल्यावर डेंग्यू होतो. त्यामुळे मच्छर काय करू शकतो, हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. निवडणुकीच्या मैदानात सर्व काही समोर येईल. जनतेला सर्व माहीत आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पाऊल उचलले ते आमच्या साक्षीने उचलले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि नाशिकचे 12 माजी नगरसेवक सहभागी झाले आहेत. आमचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. येणाऱ्या काळात आमच्या गटाची संख्या वाढतच जाईल, असे देखील गोडसे म्हणाले.

नाशकात शिवसेनेच्या 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर,
त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला.
माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांची संख्या देखील बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये वाढत आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची पायाखालील वाळू सरकत आहे.
आगामी काळात नाशिक महापालिकेवर आमच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे, असेही गोडसे म्हणाले.

Web Title :- Hemant Godse | hemant godse responds to sanjay rauts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session -2022 | ‘तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का?’ देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे गटाच्या आमदाराला ऑफर

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर FIR

Deepika Padukone | बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकनीची किंमत ऐकून व्हाल थक्क