कॉंग्रेसने राखलेला गडही गेला, सेनेवरच विश्वास

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ च्या मोदी लाटेतही कॉंग्रेसने विजय मिळविलेला हिंगोली लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसला गमवावा लागला. शिवसेनेचे हेमंत पाटील शिस्तबध्द प्रचार, वंचित फॅक्टर यामुळे हिंगोलीतून विजयी झाले. वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांनी प्रचार करून मोठी यंत्रणा निर्माण करून हवा केली होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेत कॉंग्रेसची लाज राखणारा निकाल हिंगोलीत लागला होता. राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना हरवून १६३२ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या लोकसभा निव़डणूकीत शिवसेनेतून भाजप आणि नंतर कॉंग्रेसमध्ये गेलेले सुभाष वानखेडे यांना आयत्यावेळी उभे करण्यात आले. कॉंग्रेसने चेहरा बदलल्याचा व सुभाष वानखेडेंनी पक्ष बदलल्याचा फटकाही त्यांना बसला. तर वंचित बहुजन आघाडीने तेथे मोहन राठोड यांना उमेदवारी देऊन येथील निकालाची गणितंच बदली. वंचित फॅक्टरचा फटका मात्र कॉंग्रेसला बसला.

हिंगोलीत १९९६ नंतर सलग दुसऱ्यांदा एका पक्षाला सत्ता मिळाली नाही. या मतदारसंघाची ही ओळखच बनलेली दिसते आहे. तर वानखेडे यांना त्यांच्या हदगावनेही नाकारत सेनेवरच विश्वास दाखवला. तर सहाही विधानसभा मतदारसंघांनी सेनेला भरभरून मतदान केले.

हेमंत पाटील (शिवसेना) – ४१४३३८

मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी) – ११८७९२

सुभाष वानखेडे कॉंग्रेस – २१७१५१

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

मतदारसंघ भाजप कॉंग्रेस वंचित

हिंगोली ७२,८९४ ३६,९९४ २७,९०८

वसमत ६९,५१७ ३३,७७८ २२५९३

कळमनूरी ७१,३७४ ३९,४५७ २९,५२३

उमरखेड ८२,९२२ ४१,४२५ १५३०८

हदगाव ६६,५६५ ३५,६०१ २१००९

किनवट ७५,८५० ३९,९६१ १४,११८

हिंगोलीतील एकूण मतदार – १७ लाख ३२ हजार ५४०

पुरुष मतदार – ९ लाख ५२ हजार २२९

महिला मतदार – ८ लाख २७ हजार २९८

हिंगोलीत झालेले मतदान- ११ लाख ५२ हजार ५४८ टक्केवारी – ६६.२९

You might also like