Hemant Rasane | रवीभाऊ, देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा, हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Pune Kasba Peth Bypoll Election) झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला आणि मागील तीस वर्षापासून भाजपच्या ताब्यात असलेला कसबा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रवींद्र धंगेकर म्हणाले होते की, फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जातील, त्यांनी निवडणुकीत किती पैसा वाटला किती काही केलं तरी क्षणिक आनंद आहे. त्यांची सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील घालणार नाहीत.

लोकशाहीची हत्या कशी करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. देवेंद्र यांचं मत दुश्मनीच आहे. कलांतराने त्याचा त्यांना पश्चाताप होणार आहे, दबावाचे राजकारण सुरु आहे. या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, असे धंगेकर म्हणाले होते. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना हेमंत रासने यांनी तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले, रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन आहेच.
आपण मा. देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले.
आपण ज्या विधानभवनात (Vidhan Bhavan) पाऊल ठेवणार आहेत,
त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व फडणवीस यांनी सलग पाच वर्षे केले आहे.
त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा. देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण
नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा.
बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत, असा सल्ला रासने यांनी दिला.

Web Title :-  Hemant Rasane | be careful when talking about ravi bhau devendra fadnavis hemant rasane advice to ravindra dhangekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Latur Crime News | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

NCP MP Supriya Sule | आधी खाल्ल मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन, शिवसेना नेत्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेचं स्पष्टीकरण