Hemant Rasne | सुवर्णयुग सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust) प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बँकेच्या (Suvarnayug Sahakari Bank) अध्यक्षपदी (President) हेमंत रासने (Hemant Rasne) आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत (Vice President Nitin Raut) यांची नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. हेमंत रासने (Hemant Rasne) बँकेचे ज्येष्ठ संचालक आहेत.

 

हेमंत रासने (Hemant Rasne) बँकेचे ज्येष्ठ संचालक असून, सन 2009 ते 2011 या कालावधी त्यांनी बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कारकिर्दीत बँकेने ‘नॉन परफॉर्मिंग ॲसेटस’चे (एनपीए-NPA) प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले होते. रासने महापालिकेच्या स्थायी समितीचे (PMC Standing Committee) सलग चार वेळा अध्यक्ष होते. महापालिकेला कोरोना (Corona) काळातही विक्रमी महसूल उत्पन्न जमा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख म्हणूनही रासने कार्यरत आहेत.

 

अध्यक्षपदी निवड झाल्यावर रासने म्हणाले, ‘सुवर्णयुग बँकेची स्थापना 2 ऑक्टोबर 1973 रोजी झाली. सध्या बँकेच्या 22 शाखा आणि मुख्यालय आहे. बँकेचा व्यवसाय 1335 कोटी रुपये असून, 809 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 526 कोटी रुपयांची कर्जे आहेत. येत्या आर्थिक वर्षात बँक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. नजिकच्या काळात बँकेचा शाखा विस्तार 50 पर्यंत आणि व्यवसाय पाच हजार कोटी रुपये करण्याचा निर्धार आहे. तसेच एनपीए शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बँकेच्या मुख्यालयाची स्वतंत्र आणि भव्य वास्तू साकारणार आहोत.’

नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन राऊत यांना बँकिंग कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक,
आरोग्य आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
शाहुराज हिरे (Shahuraj Hiray) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

 

Web Title :- Hemant Rasne | Hemant Rasane elected unopposed as chairman of Suvarnayug Sahakari Bank, Nitin Raut as vice chairman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage | यंदा कर्तव्य आहे.. ! अखेर रणबीर – आलियाच्या लग्नाची तारीख आली समोर…

 

Pune Crime | मोटार विक्रीच्या व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण; मृत म्हणून टाकले माळशेज घाटात

 

Pune Crime | सराईत गुन्हेगार समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर CP अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई