स्थायीच्या अध्यक्ष पदी हेमंत रासने तर सभागृह नेते पदी धीरज घाटे ‘फायनल’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी भाजपचे नगरसेवक हेमंत रासने यांची तर सभागृह नेते पदी धीरज घाटे यांची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहित सुत्रांनी दिली आहे. आज (मंगळवार) दुपारी 3 वाजल्यानंतर त्याबाबत अधिकृतरित्या घोषणा केली जाणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पीएमपीएमएलच्या संचालक पदाची निवड आगामी सर्वसाधारण सभेत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नगरसेवक हेमंत रासने हे तिसर्‍यांदा नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेवर निवडुन गेले आहेत. यापुर्वी ते एकदा स्वीकृत सदस्य देखील होते. रासने हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष आहेत. सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनिल कांबळे यांची आमदारपदी निवड झाल्याने भाजपने त्यांना स्थायी समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. होते. त्यानुसार त्यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

सभागृह नेते धीरज घाटे हे पहिल्यांदाच पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडुन गेलेले आहेत. ते भाजपच्या प्रदेश कार्यकरिणीतीत सरचिटणीस पदी कार्यरत आहेत. गणेश मंडळाच्या माध्यमातून तयार झालेला तळागाळातील युवा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. यापुर्वी दोन वेळा त्यांच्या वहिनी नगरसेवक राहिल्या आहेत.

Visit : policenama.com