Hemoglobin Deficiency | हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरात वाढतात अनेक समस्या, ‘या’ आहाराने वाढवा पातळी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hemoglobin Deficiency | शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी, शरीरातील हिमोग्लोबिन (Hemoglobin) ची पातळी संतुलित असणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिन शरीराच्या अवयवांमधून कार्बन डाय ऑक्साईड (Carbon Dioxide) बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरते. निरोगी पुरुषाच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 13.5 ग्रॅम प्रति डेसीलीटर असावे, तर महिलांच्या रक्तातील 12 ग्रॅम प्रति डेसीलीटर असावे. (Hemoglobin Deficiency)

 

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्वचा पिवळी पडणे, थकवा येणे, स्नायू कमकुवत होणे, डोकेदुखी अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणारा डाएट जाणून घेवूयात…

 

1. टरबूज (Watermelon)
उन्हाळ्यात आढळणार्‍या टरबूजमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. हे फळ केवळ आयर्नच नाही तर ते व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी आयर्न शोषण्यास मदत करते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. एका कप टरबूजमध्ये सुमारे 0.4 मिलीग्रॅम आयर्न असते. (Hemoglobin Deficiency)

 

2. पालक (Spinach)
आजच्या युगात अनेकांना हिरव्या भाज्या खायला आवडत नाहीत. विशेषतः मुले पालक किंवा हिरव्या पालेभाज्या खाण्यास टाळाटाळ करतात. हिरव्या भाज्या खाल्ल्याने अनेक फायदे होतात. आयर्नसाठी रोजच्या आहारात पालकाचा समावेश करा. हे जलदगतीने आयर्न प्रदान करते आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. 100 ग्रॅम पालक खाल्ल्याने चार मिलीग्रॅमपर्यंत आयर्न मिळते.

 

3. सोयाबीन आणि राजमा (Soybeans and kidney beans)
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शेंगा खाव्यात. शेंगांमध्ये विशेषतः सोयाबीन, राजमा आणि मटार खाऊ शकता. सोयाबीन, राजमा आणि वाटाणा कोणत्याही भाजीत मिसळून खाऊ शकता. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते. 100 ग्रॅम सोयाबीनमधून सुमारे 15.7 मिलीग्रॅम आयर्न मिळते.

4. सफरचंद (Apple)
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपायांमध्ये सफरचंदांचाही समावेश आहे. रोज एक सफरचंद खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी सामान्य होते. सफरचंदांमध्ये आयर्न आणि इतर पोषक घटक असतात, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्य करण्यासाठी आवश्यक असतात.

 

हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी रोज एक सफरचंद खावे किंवा अर्धा कप सफरचंद आणि बीटचा रस दिवसातून दोनदा प्यावा. हा रस चवदार बनवण्यासाठी तुम्ही आले आणि लिंबाचा रस देखील घालू शकता.

 

5. चिकन ब्रेस्ट (Chicken Breast)
आहारात चिकन ब्रेस्टचा समावेश करून हिमोग्लोबिनची पातळी झपाट्याने वाढवू शकता.
चिकन ब्रेस्ट हा आयर्नचा मुख्य स्त्रोत आहे. 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमधून 0.7 मिलीग्राम आयर्न मिळते.
हिमोग्लोबिन सामान्य पातळीपेक्षा कमी असेल, तर दररोज किमान एकदा तरी चिकन ब्रेस्ट खा.

 

6. योग (Yoga)
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी व्यायाम किंवा योगाची मदत घेऊ शकता.
मध्यम आणि वेगवान एरोबिक्स आणि इतर व्यायाम रक्तपेशी वाढवतात. हिमोग्लोबिन रक्तपेशींमध्ये असते,
जे फुफ्फुस आणि इतर अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.
व्यायामासोबतच श्वासोच्छवासाशी संबंधित अनेक योगासने आहेत. जी तुमचे हिमोग्लोबिन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hemoglobin Deficiency | home remedies hemoglobin deficiency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vitamin B6 Rich Foods | Vitamin B6 च्या कमतरतेमुळे होऊ शकतात Cancer सारखे जीवघेणे आजार, बचावासाठी खा ‘हे’ 4 Foods

Tea Side Effects | High Blood Pressure च्या रूग्णांसाठी नुकसानकारक आहे या मसाल्याचा चहा, Avoid करणे चांगले

Teeth Health | दातांच्या शत्रू आहेत ‘या’ खाण्या-पिण्याच्या 5 वस्तू, आजपासून व्हा त्यापासून दूर