पुण्यात १६ किलो गांजासह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील स्वारगेट परिसरात शंकरशेठ रस्त्यावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून ३ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा १६ किलो ६२ ग्रॅम वजानाचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुरज धनराज राठोड (वय-२१, रा. तेलंगणा, आंध्र प्रदेश), देवीसिंग बद्दुसिंग राठोड (वय-२९,रा. तेलंगणा, आंध्र प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

शंकरशेठ रोडवरील वेगा सेंटरसमोर गांजा घेऊन दोघेजण आले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बापु रायकर व पोलीस नाईक मनोज साळुंके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून दोघांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे १६ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी तो गांजा जप्त केला करून अटक केली आहे. दोघांवर ख़डक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर, पोलीस उपनिरीक्षक तागड तागड तसेच कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची