विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हातापायावर पांढरे डाग आहेत म्हणून पती, सासू व सासऱ्याकडून वांरवार होणार छळ व वारंवार केली जाणारी पैशांची मागणी या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार हडपसरमध्ये उघडकिस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या पती सासू व सासऱ्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर पती व सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

राणी उर्फ शीतल राहूल बरळ (३३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. राहूल अंकुश वरळ, अंकुश वरळ यांना अटक कऱण्यात आली आहे. तर शोभा अंकुश वरळ यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल व राहूल वरळ यांचे लग्न २०१२ साली झाले होते. त्यानंतर ती सासरी नांदत असताना तिच्या हात पायावर पांढरे डाग आहेत. म्हणून पती सासू व सासरे यांच्याकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. तसेच तिला फ्लॅटसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकऱणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पती व सासऱ्याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के. एस. लोंढे करत आहेत.