Hera Pheri 3 |अखेर पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी राजू, शामसोबत बाबू भैय्या सज्ज; ‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला झाली सुरुवात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Hera Pheri 3 | हेराफेरी हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने पाहतात. 2000 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले होते. यानंतर 2006 मध्ये ‘फिर हेरा फेरी’ हा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. तर आता प्रेक्षक हेरा फेरी 3 ची आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची अपडेट समोर आली आहे. (Hera Pheri 3)

हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी यानंतर प्रेक्षकांना आतुरता होती तर ती या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची. आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून या चित्रपटात कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत झळकणार असे म्हटले गेले होते. कार्तिक या चित्रपटात राजू ही भूमिका साकारणार अशी चर्चा होती. मात्र आता राजू हि भूमिका अक्षय कुमार साकारणार असल्याचे समोर आले आहे. नुकताच अक्षयने हेराफेरी तीन मध्ये काम करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांमध्ये सुनील शेट्टी, अक्षय कुमार, परेश रावल आणि निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्यामध्ये मुंबई येथे एम्पायर स्टुडिओमध्ये बराच वेळ मीटिंग झाली आणि त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Hera Pheri 3)

हेराफेरी चित्रपटाचा पहिला भाग 2000 मध्ये तर दुसरा भाग 2006 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
तर आता तब्बल 17 वर्षानी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चाहते आता या चित्रपटाची वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये परेश रावल यांना या चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.
‘हेरा फेरी’ आणि ”अंदाज अपना अपना’ या चित्रपटाचा सिक्वेल कधी रिलीज होणार आणि
या सिक्वेल मध्ये काम करण्यासाठी तुम्ही किती एक्साईटेड आहे? या प्रश्नाला उत्तर देताना परेश रावल म्हणाले की,
“मला जर पुन्हा धोती आणि चष्मा घालून तशी भूमिका करावी लागली तर मी फक्त आणि फक्त पैशांसाठीच एक्साईटेड असेल.
त्यापेक्षा जास्त कोणत्याही गोष्टींसाठी मी एक्साईटेड नसणार”.
अशी प्रतिक्रिया बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल यांनी दिली होती.
त्यामुळे आता हेरा फेरी 3 हा चित्रपट हेराफेरी आणि फिर हेरा फेरी इतका यशस्वी होतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Hera Pheri 3 | hera pheri 3 begins in mumbai with og trio akshay kumar suniel shetty and paresh rawal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘येथे सोने, चांदी, पैसे स्विकारले जाईल, मत मात्र…’, कसब्यातील ‘त्या’ पोस्टरची शहरात चर्चा

IPL 2023 | CSK च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूचे टीममध्ये झाले पुनरागमन

Pune Crime News | विश्रांतवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई