मुंबई : Heramb Shelke | प्रसिद्ध व्यावसायिक हेरंब शेळके यांनी आज (दि.३) सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शेळके यांनी फडणवीस यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar), समित कदम (Samit Kadam), विक्रम विनोदे (Vikram Vinode), सागर बालवडकर (Sagar Balwadkar), नरेंद्र बालवडकर (Narendra Balwadkar), विक्रम साखरे (Vikram Sakhare) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अमोल बालवडकर म्हणाले, १० वर्ष पक्षाचे तन-मन-धनाने अथक काम केल्यानंतर मी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून इच्छुक होतो. त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून माझ्या इच्छेचा सन्मान करून निवडणुकीत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, नेत्याचा आदेश ‘सर आँखो पर’ प्रमाणे मी ते मान्य केले.
याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजी यांनी आज भेट दिली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघ येथून चंद्रकांत पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा शब्द ही देवेंद्रजी यांना दिला असल्याचेही यावेळी बालवडकर यांनी सांगितले.