Herbs for Cholesterol | रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले खराब कोलेस्ट्रॉल 2 दिवसात बाहेर काढतील ‘या’ 8 आयुर्वेदिक वनस्पती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Herbs for Cholesterol | खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) धमन्यांमध्ये तयार होऊन त्यांना कडक करू शकते किंवा त्यांना ब्लॉक करू शकते, ज्यामुळे हृदयविकार (Heart Disease), नसांसंबंधी रोग आणि इतर रोगांचा धोका वाढतो. रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यास हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढू शकतो (Herbs for Cholesterol).

 

शरीराला कोलेस्टेरॉल (Cholesterol) ची गरज असते. कोलेस्टेरॉल शरीरात निरोगी पेशी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्याशिवाय शरीर कार्य करू शकत नाही. वास्तविक ते चांगले कोलेस्ट्रॉल असते, जे शरीरासाठी आवश्यक असते. वाईट कोलेस्ट्रॉल देखील असते, जे शरीरासाठी धोकादायक आहे. रक्तातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.

 

खराब कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये (Arteries) तयार होऊन त्यांना कडक करू शकते किंवा त्यांना ब्लॉक करू शकते, ज्यामुळे हृदयविकार, नसांसंबंधी रोग आणि इतर रोगांचा धोका वाढतो. 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलची पातळी 100 मिलीग्रॅम/डीएल पेक्षा कमी असावी, आणि 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये 100 मिलीग्रॅम/डीएल पेक्षा कमी असावी.

 

 

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार (Dr. Diksha Bhavsar) यांच्या मते, कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या टिप्स (Cholesterol Reduce Tips) बाबत बोलायचे तर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याने आणि निरोगी आहार घेतल्याने वाईट कोलेस्ट्रॉलचा सामना करण्यास मदत होऊ शकते. आवळा आणि जिरे यांसारख्या अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Ayurvedic Medicinal Plants) आहेत, ज्याचा वापर करून शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता (Herbs for Cholesterol) येते.

 

1. आवळा (Amla)
कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा खा. आवळा रस (Amla Juice) किंवा पावडरच्या (Amla Powder) स्वरूपात घेऊ शकता. हे टॅब्लेट किंवा फळ स्वरूपात देखील सेवन केले जाऊ शकते.

 

 

2. जिरे, धणे आणि बडीशेप (Cumin, Coriander, Fennel)
या औषधी वनस्पतींचा फायदा घेण्यासाठी त्यांचा चहा (Tea) प्या. बडीशेप आणि जिरे माऊथ फ्रेशनर म्हणून किंवा जेवणानंतरही खाऊ शकतात. तुम्ही ते गरम पाण्यात मिसळूनही पिऊ शकता.

 

 

3. लसूण (Garlic)
रिकाम्या पोटी लसणाची पाकळी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. हे कोलेस्ट्रॉल तसेच बीपी (BP) कमी करण्यास मदत करते.

 

 

4. लिंबू (Lemon)
लिंबू कोमट पाण्यात एकतर रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर एक तासाने घ्या. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीसह (Vitamin C) सर्व पोषक घटक असतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे.

 

 

5. आले (Ginger)
हे तुमच्या हर्बल चहामध्ये (Herbal Tea) मिसळता येऊ शकते आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा सेवन केले जाऊ शकते.
सुंठ पावडर (Ginger Powder) सकाळी मधासोबत (Honey) किंवा पाण्यात उकळून दिवसभर सेवन करता येते.

 

 

6. अर्जुन (Arjun)
हे हृदयासाठी चांगले आहे. त्याची साल दुधात मिसळून झोपताना अर्जुन चहा म्हणून घेऊ शकता
किंवा अर्जुनाची साल सकाळी शंखरूपात घेऊ शकता. अर्जुन टॅब्लेट (Arjun Tablet) देखील दररोज सेवन करता येईल.

 

 

7. गुग्गुळ (Commiphora wightii)
हे डिंक आहे जे चरबी वितळण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
हे एकच औषध म्हणून किंवा मेदोहर-गुग्गुळ (Medohar-Guggul) किंवा त्रिफळा-गुग्गुळ (Triphala-Guggul)
इत्यादी इतर औषधी वनस्पतींसह सेवन करता येऊ शकते.

 

 

8. त्रिफळा (Triphala)
हे अमलकी (Amalki), हरितकी (Haritaki) आणि विभिताकीपासून (Vibhitaki) बनवलेले एक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक सूत्र आहे.
त्रिफळा आणि त्रिकटू (Trikatu) हे दोन्ही मधासोबत चूर्ण किंवा गोळीच्या स्वरूपात सेवन करता येते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Herbs for Cholesterol | according to ayurveda expert 8 indian herbs and spices that can manage cholesterol level naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Education News | एका गुणासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांने लढली 3 वर्षे न्यायालयीन लढाई, अखेर मिळाले 28 गुण वाढवून

 

Blood Sugar And Cholesterol Level | डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलची समस्या करू शकते ‘ही’ एक गोष्ट, डाएटमध्ये करा समावेश

 

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बनावट प्रमाणपत्रांव्दारे केलं पास; 650 बोगस प्रमाणपत्रे जप्त