सावधान ! जगातील ‘हे’ 10 धोकादायक पासवर्ड, चुकूनही करू नका याचा वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   तुमच्यापैकी अनेक लोक आपला फोन, आपला ई-मेल आणि सोशल मीडियासह इंटरनेट बँकिंगसाठी पासवर्डचा वापर करत असाल. मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने 10 धोकादायक पासवर्डची लिस्ट जारी केली आहे.

ब्रिटनचे नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने गेल्या 12 महिन्यांत सर्वात जास्त वापर होणाऱ्या पासवर्डची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. जास्तीत जास्त लोक जनरल पासवर्डचाच वापर करतात. पण असे करणे तुमच्या सुरक्षेसाठी योग्य नाही. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू नये. सायबर सुरक्षेवरून ब्रिटनचे राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राचे टेक्नॉलॉजी संचालक डॉ. इयान लेव्ही यांनी सांगितले की, आम्हाला वाटते सायबर सुरक्षा अनेक लोकांसाठी कठीण काम आहे. तुम्ही तुमचा पासवर्ड सुरक्षित असा ठेवणे गरजेचे आहे. एकाच पासवर्डचा अनेकदा वापर धोकादायक ठरू शकतो.

सर्वात जास्त वापरले जाणारे 10 पासवर्ड…

– 123456

– 123456789

– qwerty

– password

– 111111

– 12345678

– abc123

– 1234567

– passwordi

– 12345