‘कोरोना’च्या काळात सर्वात जास्त ‘या’ 10 नोकर्‍यांना ‘डिमांड’, एकदम ‘फ्री’मध्ये शिका Skills, Job मिळण्यास येणार नाही कसलीच ‘अडचण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लागू केले आहे, ज्यामुळे सर्व व्यवसाय बंद झाले आहे अशामध्ये लोकांनी जागतिक स्तरावर त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. जगासमोर बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत. त्यासाठी त्यांच्यामध्ये योग्य आणि उत्कृष्ट Skills असणे आवश्यक आहेत. हे असे Skills आहे जे तुम्ही ऑनलाईन देखील शिकू शकता.

मायक्रोसॉफ्ट आणि लिकेंडिन यांनी 10 उच्च नोकऱ्या शोधून काढल्या आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी नोकरी करू इच्छिणाऱ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देखील दिले आहेत. आपल्या ब्लॉगमध्ये, लिकेंनडिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायन रोझलास्की यांनी म्हटले आहे की, कोविड -19 मुळे नोकरी गमावलेल्या लोकांना आम्ही मदत करू इच्छित आहोत आणि त्यांना नवीन नोकरीसाठी आवश्यक कौशल्य विनामूल्य शिकवून पुढील नोकरी मिळविण्यात मदत करू इच्छित आहोत. अशाप्रकारे, नोकरी मिळविण्याऱ्या इच्छुकांना जागतिक स्तरावर नवीन संधी देऊन ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

या व्यावसायिक नेटवर्किंग साइटचे म्हणणे आहे की, सध्या त्यांच्याकडे 69 कोटी व्यावसायिक, 5 कोटी कंपन्या, 1.1 कोटी नोकर्‍यांची यादी, 36 हजार स्किल्स आणि 90 हजार शाळा त्यांच्या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत, ज्याच्या मदतीने त्यांच्याकडे मागणीचे स्किल्स, उदयोन्मुख रोजगार आणि जागतिक रुपाने या जॉबसाठी हायरिंग पॅटर्नची ओळख आहे. या आकडेवारीच्या आधारे, या महामारीच्या वेळी अशा 10 खास रोजगारांची ओळख पटली आहे, ज्यांना जास्त मागणी आहे आणि पुढील 4 वर्षांमध्ये मागणी राहील, तर या रोजगारांसाठी आवश्यक कौशल्ये ऑनलाईन शिकू शकता. या टॉप 10 रोजगार खालीलप्रमाणे आहेत.

मोठी मागणी असलेले 10 मुख्य रोजगार
> डिजिटल मार्केटर
> आयटी सपोर्ट / हेल्प डेस्क
> ग्राफिक डिझायनर
> आर्थिक विश्लेषक
> डेटा विश्लेषक
> सॉफ्टवेअर विकसक
> प्रकल्प व्यवस्थापक
> विक्री प्रतिनिधी
> आयटी प्रशासक
> ग्राहक सेवा विशेषज्ञ

या 10 जॉबसाठी employment-oriented online service ने त्यांचे कौशल्य शिकण्यासाठी मार्ग प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले आहेत आणि या मॉड्यूलच्या शेवटी नोकरी करण्यास इच्छुकांना पूर्ण प्रमाणपत्रही दिले जाईल.