‘इथं’ भाऊ आणि वडील त्यांच्या बहिण-मुलीच्या देहाची लावतात ‘बोली’

रतलाम/ मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – जगभरामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे परंपरेच्या नावाखाली लोक महिलांच्या शरिराचा सौदा करतात. मध्य प्रदेशातील बचरा या आदिवासी समाजात ही अशीच परिस्थिती आहे. या समुदायातील एखाद्या कुंटुंबात जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा घरातील लोक आनंदोत्सव साजरा करतात. महिलांच्या सन्मानासाठी हा  आनंदोत्सव साजरा केला जात नाही तर त्यांना वाटते की त्यांच्या घरात मिळकतीचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. या समाजाची परंपरा आहे की महिला देह विक्री करून परिवाराच्या खर्चाची काळजी घेतात.

या समाजातील पुरुष आपल्या बहिणीच्या, मुलीच्या देहाची विक्री करतात. हा समाज मध्य प्रदेशातील नीमच, मंदसौर, रतलाम आणि इतर भागात राहतो. घरातल्या महिलाही कधी याचा विरोध करत नाहीत. प्रत्येक रात्री, कोठे व कोणाबरोबर जायचे ते वडील किंवा भाऊ इशारा करून सांगतात. त्यानंतर त्या  व्यक्तीसोबत महिला जातात. या समाजात अशीही परंपरा आहे की, एखाद्या व्यक्तीला मुलीशी लग्न करायचे असेल तर त्या मुलीच्या घरच्यांना मोठी रक्कम द्यावी लागते.

या ठिकाणी मुलीचे लग्न होण्यापूर्वी पंचायत बसवली जाते. ही पंचायत मुलीच्या दिसण्यावरून आणि तिच्या वयानुसार मुलीची किंमत ठरवते. जर बोली लावणारे एकापेक्षा जास्त असतील तर जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत मुलीचे लग्न लावून दिले जाते. सरकारने या समजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लोक अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा सोडण्यास तयार नाहीत.