अभिनेता रणवीर सिंगची अशी ‘खेचली’ प्रियंका चोप्रानं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणवीर सिंग आणि प्रियंका चोपडा यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री खूपच छान आहे. अनेकदा दोघांमध्ये चांगली बाँडिंग पाहायला मिळाली आहे. प्रियंका चोपडा आणि रणवीरने गुंडे आणि बाजीराव मस्तानी सिनेमात एकत्र काम केले आहे. एका मुलाखतीत रणवीरने सांगितले आहे की, प्रियंका कशा प्रकारे त्याची टांग ओढायचे काम करत होती.

मुलाखतीत बोलताना रणवीर सिंग म्हणाला की, “प्रियंका मला नेहमीच म्हणते की, तू तो मुलगा आहे ज्याला अजूनही विश्वास होत नाही की तो स्टार झाला आहे. जो आजही म्हणतो आई मी स्टार झालो आहे. ही लोकं माझा फोटो काढत आहेत.” रणवीरला इंडस्ट्रीत सर्वात डाऊन टू अर्थ अ‍ॅक्टर मानलं जातं. आपल्या विनम्रतेबाबत बोलताना रणवीर सिंग म्हणाला की, “मी स्पेशल केस आहे. कारण माझ्या मते मी मोठा स्टार नाही. मी अजूनही त्या मुलाप्रमाणे आहे ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि त्याला अजिबातच खात्री नाही की, तो स्टार आहे.”

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या रणवीर सिंग 83 सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात दीपिकाही त्याच्यासोबत त्याच्या पत्नीच्या भूमिकेतच दिसणार आहे. रोमी भाटियांचा रोल तिने साकारला आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या कप्तानीखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपवर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.

You might also like