जर तुमचे व्हॅलेंटाईन 40 च्या दशकात करत असेल पदार्पण, तर त्यांच्यासाठी ही असू शकते सर्वात चांगली भेट

पोलिसनामा ऑनलाईन – जर तुमच्या पार्टनरने 40 च्या दशकात पदार्पण केले असेल, तर तुमचे हे समंजस प्रेम दर्शवण्यासाठी तुम्हाला दोघांनाही आता आणखी सतर्क व्हावे लागेल. जाणून घेवूयात या व्हॅलेंटाईनला त्यांच्यासाठी काय असू शकते गिफ्ट. आम्ही तुम्हाला 5 अशा समस्याबाबत सांगणार आहोत, ज्यांची जोखीम 40 वयानंतर वाढते. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमचे आणि त्यांचे आरोग्य, आहार आणि जीवनशैलीची काळजी घ्या. जाणून घेवूयात याबाबत…

40 नंतर अशाप्रकारे घ्या आरोग्याची काळजी

1. वजन कंट्रोल करण्यासाठी कपल योग करा
कारण वजन वाढल्याने हृदय रोग, टाइप 2 मधुमेह, जुना ऑस्टियोआर्थरायटिस आणि काही प्रकारच्या कॅन्सरसह अनेक आरोग्य स्थितीची जोखीम वाढते.

2. कोलेस्ट्रॉलवर लक्ष ठेवा
कारण 40 वयानंतर रक्तदाब आणि हृदयासंबंधीच्या समस्यांची जोखीम वाढते. पोषक आजार घ्या. कुकीज, जंक फूड आणि ट्रान्स फॅटवाला आहार टाळा.

3. मांसपेशींची हानी टाळा
दोघांनी आपल्या रूटीनमध्ये एक्सरसाइज आणि शारीरिक हालचालींचा समावेश करावा. अन्यथा मांसपेशींच्या हानीची जोखीम वाढते.

4. वाढू शकते डायबिटीजची जोखिम
लठ्ठपणा, तणाव आणि चुकीचा आहार यामुळे 40 वयानंतर टाइप -2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. नियमित व्यायाम करा, धूम्रपान टाळा, दारूचे सेवन टाळा, योग्य झोप घ्या, तणावाचे व्यवस्थापन करा.

5. हाडे कमजोर होऊ लागतात
यासाठी वाढत्या वयासोबत कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

6. कमी होऊ शकते लिबिडो
तणाव आणि चुकीच्या सवयांचा परिणाम 40 च्या वयात लिबिडोवर दिसून येऊ शकतो. 40 च्या नंतर या समस्यांचा कामेच्छेवर मोठा परिणाम होतो. यासाठी चांगला डाएट घ्या, योगा आणि प्राणायाम करा. यामुळे सेक्सची क्षमता, इच्छा वाढेल.