‘या’ सोप्या टीप्सनं तुमचं WhatsApp करा सुरक्षित, नाही होणार हॅक, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपचा सध्या जास्त वापर केला जात आहे. अशात हॅकर्स पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. यावेळी जुन्या पद्धतीने व्हॉट्सऍप हॅक केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१८ सोशल हॅकिंग पद्धत वापरुन हॅकर्स लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करत होते. आता कोरोना विषाणूच्या काळात हीच पद्धत पुन्हा वापरली जात आहे.

व्हॉट्सऍप सुरक्षित ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 2 step verification. हे अनेबल करण्यासाठी प्रत्येक वेळी व्हॉट्सऍपवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला एक ओटीपी आवश्यक असेल. जर कोणी दुसर्‍याने तुमच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ओटीपी आवश्यक असेल, जो फक्त तुमच्याकडेच असेल.

Free WiFI Public Network वापरुन व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. हॅकर्स WiFI द्वारे तुमचा फोन हॅक करून तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात आणि तुमचे व्हॉट्सऍप ऍक्सेस करू शकतात. म्हणून शक्य तितक्या पब्लिक वायफायने व्हॉट्सऍप चालवू नका.

आपल्या फोनमध्ये नेहमीच सिक्युरिटी लॉक ठेवा. त्याचा तुम्हाला फायदा होईल की, कोणतीही अनधिकृत व्यक्ती तुमच्या फोनमधील व्हॉट्सऍप व इतर अ‍ॅप्समला ऍक्सेस करू शकणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवर जेव्हा एखादे अपडेट येते, तेव्हा ते अपडेट करत राहा कारण ते सुरक्षेसाठी खूप महत्वाचे आहे.

असे सुरक्षित करा आपले व्हाट्सऍप
व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सना त्यांचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड इतरांशी कधीही शेअर करू नये, असा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या FAQ पेजमध्येही असे म्हटले आहे की, युजर्स त्यांचा फोन नंबर पुन्हा व्हेरिफाय करून त्यांचे चोरी केलेले खाते परत मिळवू शकतात.

याशिवाय सुरक्षेसाठी “टू-स्टेप व्हेरिफिकेशन” सेटिंग सक्रिय करण्याचाही सल्ला दिला आहे. यामध्ये खाते केवळ एका सुरक्षा कोडद्वारे नोंदणीकृत केले जाऊ शकत नाही.