‘इथं’ FDवर मिळतं 9 टक्के व्याज, गुंतवणूक करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आरबीआयकडून मागील काही महिन्यांपासून रेपो दरात कपात करण्यात येत आहे. रेपो दरात कपातीनंतर बँकेकडून कर्ज स्वस्त करण्यात आले आहेत. कर्जावरील व्याज दर बँकांकडून कमी करण्यात आले. परंतू बचत खात्यावर बँकांकडून मिळणारे व्याज देखील कमी करण्यात आले.

एसबीआय 2 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंत असलेल्या फिक्स्ड डिपॉजिटवर (FD) 6.25 टक्के व्याज दर देत आहे. इतर बँकांनी देखील एफडीवरील व्याज दरात कपात केली आहे. परंतू असे काही प्रोडक्ट्स आहेत जेथे तुम्हाला वर्षाला 9 टक्के दराने व्याज दर मिळू शकतो.

येथे एफडीवर मिळते बँकेपेक्षा जास्त व्याज –
बँकांच्या काही वित्तीय कंपन्या फिक्स्ड डिपॉजिट प्रोडक्ट्सची ऑफर देतात. या कंपन्या गुंतवणूक केल्यास 9 टक्के दराने व्याज दर देतात. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्स सर्विसेज लिमिटेड पाच वर्षांच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज दर देतात. या कंपन्या 4 वर्षापासून 3 वर्षापर्यंतच्या गुंतवणूकीवर देखील हेच व्याज देतात. दर 2 वर्षांच्या एफडीवर 7.6 टक्के व्याजपासून 7.9 टक्के व्याज दर देतात. तर 1 वर्षाच्या एफडीवर 7.6 टक्के व्याज देण्यात येते. परंतू यासाठी तुम्हाला किमान 10 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल.

पीएनबी हाऊसिंग कॉर्पोरेट डिपॉजिट स्कीमअंतर्गत 5 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर 8.45 टक्के व्याज दर देण्यात येतो. यासाठी किमान 20,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तर 4 वर्षांसाठी 8.35 टक्के व्याज, 3 वर्षांसाठी 8.20 टक्के, 2 वर्षांसाठी 8.10 टक्के व्याज आणि 1 वर्षांसाठी 8 टक्के व्याज निश्चित करण्यात आला आहे.

ही कंपनी देते 9 टक्के व्याज –
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी 5 वर्षाच्या एफडीवर 9 टक्के तर 1 वर्षांच्या एफडीवर 8 टक्के, 2 वर्षांच्या एफडीवर 8.25 टक्के, 3 वर्षांच्या एफडीवर 8.75 टक्के, 4 वर्षांच्या एफडीवर 8.85 टक्के व्याज देण्यात येते. श्रीराम युनियन फायनान्स लिमिटेड देखील समान अवधीसाठी एफडीवर हेच व्याज दर देण्यात येत आहेत.

Visit : Policenama.com