धुमधडाक्यात झाला ‘सिदार्थ-मिताली’चा हळद समारंभ ! ‘वाजले की बारा’ गाण्यावर कपलनं केला धम्माल डान्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हे गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या बातम्यांमुळं चर्चेत आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांनी त्यांच्या आयुष्यातील आनंदाच्य क्षणांचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लवकरच दोघं विवाहबद्ध होणार आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली यांचा लग्नसोहळा हा पुण्यात पार पडणार आहे. गुरुवारी (दि 21 जानेवारी रोजी) त्यांची हळद पार पडली. या हळदीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाले आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली यावेळी खूप आनंदात दिसले. कुटुंबीय आणि पाहुण्यांसोबत त्यांनीही या क्षणांचा खूप आनंद लुटला. सिद्धार्थ आणि मिताली यांनी वाजले की बारा, शांताबाई तसंच जपून दांडा धर अशा अनेक मराठी हिट साँगवर डान्सही केला.

सिद्धार्थ आणि मिताली हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईहून पुण्याला गेले आहेत. यानंतर त्यांचे काही विधी पार पडले. ज्याचे फोटो सिद्धार्थनं सोशलवर शेअर केले होते.

सिद्धार्थ आणि मिताली यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहते कमेंट करत त्यांचं कौतुक करत आहेत. काहींनी हे फोटो सोशलवर शेअरही केले आहेत.