‘मालदिव’च्या ‘मजलिस’मधून PM नरेंद्र मोदींनी जगाला दिले ‘हे’ १० मोठे संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मालदीवच्या संसदेला (पीपल्स मजलिस)  संबोधित केले. दहशतवादाच्या मुद्यावर नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला. सध्याच्या घडीला दहशतवादाचे मोठे आव्हान असल्याचे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले की, दशतवाद हा प्रत्येकासाठी धोका बनला आहे. भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी मालदीव आणि भारतातील नाते मजबूत करण्यावर जोर दिला. या भाषणातील प्रमुख दहा मुद्यांचा आढावा घेऊ या.

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले की, दहशतवाद्यांकडे बँक आणि शस्त्रांचा कारखाना नसतो. तरीसुद्धा त्यांना पैसा आणि शस्त्राची उणीव भासत नाही. दहशतवादी हे सगळे शस्त्र, पैसे कोठून मिळवतात? कोण त्यांना ही सुविधा पुरवते? मोदी म्हणाले की, अशा विषयावर एक जागतिक परिषद व्हायला पाहिजे.

२.  मोदींनी म्हंटले की, काही लोक अजूनही चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद यांच्यात फरक करण्याची चूक करत आहेत. पाणी आता डोक्यावरून चालले आहे. दहशतवाद आणि कट्टरतावाद यांचा सामना करणे जगापुढील खरी कसोटी आहे.

३. मोदी म्हणाले की, मालदीवमध्ये स्वातंत्र्य, लोकशाही, आणि शांतीच्या समर्थनार्थ भारत नेहमी मालदीवच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. १९८८ ची घटना असो किंवा २००४ ची सुनामी किंवा नुकतेच उदभवलेले पाण्याचे संकट. भारत मालदीवच्या प्रत्येक कठीण प्रसंगात मालदिवसोबत उभा आहे.

४. मालदीवच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या बैठकीत दोन्ही देशामधील जहाजसेवेबद्दलही सहमती झाली आहे. भाषणात मोदी म्हणाले, नाते फक्त दोन सरकारमध्येच नसतात तर दोन्ही देशातील लोकांमध्ये असलेला संपर्क त्या नात्याचा जिवंतपणा असतो.

५. पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरणासंबंधी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हंटले की, कोरड्या नद्या आणि वातावरणातील अनिश्चितता शेतकऱ्यांवर परिणाम कारक
ठरत आहे. हिमखंडाचे वितळणे, समुद्राची वाढत जाणारी पातळी मालदिवसारख्या देशासाठी धोकादायक बनत चालली आहे.

६. भाषणात त्यांनी दोन्ही देशामध्ये व्यापार वाढवण्यावर जोर दिला. त्यांनी म्हंटले की, इंडो पॅसिफिक क्षेत्र आपली जीवन रेषा आणि व्यापाराचा महामार्ग आहे.

७. मोदी म्हणाले की, भारत शक्तीचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करणार नाही. परंतु, अन्य देशाच्या विकासासाठी आणि संकटात भारत उभा राहील. त्यांनी म्हंटले की, मित्रांमध्ये कोणी लहान किंवा मोठा असू शकत नाही.

८. जनतेला आमच्याकडून खूप आशा आहेत आणि ही संधी आम्ही गमावणार नाही.

९. मालदीव हिंदी महासागराचाच नव्हे तर पूर्ण जगातील महत्वपूर्ण देश आहे.

१०. पंतप्रधान मोदी यांना मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त –

धक्कादायक ! प्रदूषणामुळे भारतात लाखो मुलांना गमवावा लागतो जीव

नकळत होणाऱ्या ‘ह्या’ वेदनांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते ‘जीवावर’

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम

दुर्लक्ष करू नका, ‘सायलेन्ट हार्ट अटॅक’ची लक्षणे जाणून घ्या