अवघ्या 65 हजार रुपयात 122 km ची रेंज देते Hero Electric ची ही इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : Hero Electric | देशात इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजार वेगान वाढत आहे. ज्यामध्ये कंपन्या कमी बजेटमध्ये जास्त रेंजच्य स्कूटर लाँच (Hero Electric) करत आहेत. जर तुम्ही सुद्धा कमी बजेटमध्ये एक जास्त रेंजची स्कूटर शोधत असाल तर हिरो ऑप्टिमा एचएक्स इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.

 

हिरो इलेक्ट्रिकची ही स्कूटर कंपनीची एक प्रीमियम स्कूटर आहे जी कंपनीने सिंगल आणि डबल बॅटरी ऑपशनसह लाँच केली आहे. ही स्कूटर आकर्षक डिझाईनची बनवत यामध्ये एलईडी हेडलँप, एलईडी टेल लँप आणि डिजिटल इंन्स्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फीचर दिले आहेत. (Hero Electric)

 

फुल चार्जसाठी 4 ते 5 तास

स्कूटरची बॅटरी आणि पावरबाबत बोलायचे तर कंपनीने यामध्ये 51.2 V, 30Ah क्षमतेची लियिम आयर्न बॅटरी पॅक दिला आहे ज्यासोबत 550 वॉटची बीएलडीसी मोटर दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी नॉर्मल चार्जवर फुल चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा वेळ घेते.

 

सिंग बॅटरी व्हेरिएंटची रेंज 42 किलोमीटर

या स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 122 किलोमीटरपर्यंत रेज देते ज्यासोबत 42 किलोमीटर प्रति तासाचा स्पीड मिळतो.

 

ड्युअल बॅटरी व्हेरिएंटची रेंज 82 किलोमीटर

परंतु 122 किलोमीटर प्रति चार्जची रेंज ड्युअल बॅटरी व्हेरिएंटची आहे. स्कूटरच्या सिंगल बॅटरीची रेंज 82 किलोमीटर प्रति चार्ज आहे, ज्यामध्ये 42 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड मिळातो.

 

हे आहेत फिचर्स

हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) ऑप्टिमा एचएक्सच्या फिचर्सबाबत बोलायचे तर यामध्ये डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी युएसबी पोर्ट, आकर्षक अलॉय व्हील, पोर्टेबल बॅटरी, रेजेन ब्रेकिंग सिस्टम सारखे फिचर्स दिले आहेत.

 

इतकी आहे किंमत

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा एचएक्सच्या सिंगल बॅटरी व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत 55,580 रुपये ठेवली आहे
तर तिच्या ड्युअल बॅटरी व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत 65,640 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

 

ऑनलाइन अशी खरेदी करा

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा एचएक्स स्कूटर खरेदी करण्यासाठी इच्छूक ग्राहक कंपनीच्या
अधिकृत वेबसाइटवर जाऊन हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा एचएक्स स्कूटर ऑनलाइन बुक करू शकतो.
ज्यासाठी कंपनीने 2,999 रुपयांची टोकन अमाऊंट ठरवली आहे.

 

ऑफलाईन अशी खरेदी करा

याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या डिलरशिपवर जाऊन सुद्धा ही स्कूटर विना टोकन
अमाऊंट ऑफलाइन मोडने खरेदी करू शकता भारतीय इलेक्ट्रिक बाजारात हिरो इलेक्ट्रिक
ऑप्टिमा एचएक्सची स्पर्धा टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक आणि ओकिनाव्हा आय प्रेजसोबत असल्याचे मानले जाते.

 

Web Title :- Hero Electric | hero electric optima hx electric scooter gives range of 122 km in single charge read full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा