काय सांगता ! होय, HERO च्या स्कूटरवर तब्बल 8 हजारांची ‘सुट’, ‘डाऊन’ पेमेंट फक्त 1 रूपयापासून सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सध्या तर देशात कोणताही सण नाही. परंतु कार, बाइक आणि स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सर्व वाहन कंपन्यांना 1 एप्रिलपूर्वी बीएस -4 नॉर्म्सवाल्या वाहनांचा साठा संपवायचा आहे. यासाठी हि ऑफर सुरू आहे. त्यामुळे जर आपण दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

या ऑफरअंतर्गत 29 फेब्रुवारीपूर्वी हीरो मोटोकॉर्पच्या बीएस -4 नॉर्मल डेस्टिनी आणि प्लेझर स्कूटरच्या खरेदीवर एकूण 8 हजार सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये 3000 रुपयांचे कॅश आणि 5000 रुपये एक्सचेंज आणि लॉयल्टी बेनिफिट देण्यात येत आहे. याशिवाय बीएस -4 स्कूटरवर डाउन पेमेंटही देण्यात आले आहे. हीरो मोटोकॉर्पची डेस्टिनी 125 आणि प्लेजर फक्त 5999 रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी नेऊ शकतात. काही विक्रेते तर बीएस -4 वाहनांच्या खरेदीवर केवळ 1 रुपया डाऊन पेमेंट देत आहेत. या ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी आपण कंपनीच्या शोरूमशी संपर्क साधू शकता.

वास्तविक, सर्व दुचाकी कंपन्यांसमोर बीएस -4 वाहनांचा साठा संपविणे हेदेखील एक आव्हान आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांकडून अनेक प्रकारच्या ऑफर सुरू केल्या जात आहेत. दरम्यान, हीरो मोटोकॉर्पने नुकतीच बीएस -6 नॉर्म्ससह डेस्टिनी 125 आणि प्लेजर स्कूटर बाजारात आणली आहे. अशा परिस्थितीत आता कंपन्या शक्य तितक्या लवकर बीएस -4 मॉडेलच्या विक्रीत व्यस्त आहेत.

बीएस -6 मानदंड असलेले स्कूटर बीएस -4 पेक्षा अधिक महाग आहेत. त्याचबरोबर बीएस -4 नॉर्मसह हिरो डेस्टिनी (मेटल व्हील) ची एक्स-शोरूम किंमत 56,900 रुपये आहे. तर अ‍ॅलोय व्हील मॉडेलची सुरुवातीची किंमत 59,800 रुपये आहे. त्याचबरोबर हीरो डेस्टिनी 125 बीएस -6 ची एक्स-शोरूम किंमत 64,310 रुपये आहे. दिल्लीतील बीएस -4 प्लेजर + स्कूटरची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत 48,500 रुपये आहे, यात शीट मेटल व्हील असेल. तर अ‍ॅलोय व्हील्स असलेल्या मॉडेलची सुरुवातीची किंमत 50,500 रुपये आहे. त्याच वेळी बीएस -6 प्लेझरची किंमत 54,800 रुपये आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like