Heropanti 2 First Look Poster : यावेळी दिसणार टायगर श्रॉफची जबरदस्त ‘अ‍ॅक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफनं हिरोपंती सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 2014 साली आलेल्या या सिनेमात त्याच्यासोबत कृती सेनन लिड रोलमध्ये होती. लवकरच आता या सिनेमाचा सिक्वल येणार आहे. टायगर श्रॉफनं स्वत: सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. टायगरनं हिरोपंती 2 चं पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

हिरोपंती 2 मध्ये असणार जबरदस्त अ‍ॅक्शन

टायगरच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात टायगर सुटबूट घालून एकदम माचो मॅनच्या अवतारात दिसणार आहे. पोस्टर शेअर करताना टायगर म्हणतो, “हे माझ्यासाठी स्पेशल आहे. साजिद सरांसोबत आणखी एक फ्रेंचाईजी पुढे नेण्यात मला आनंद होत आहे.” टायगरच्या पोस्टवरून दिसत आहे की, टायगर खूप एक्सायटेड आहे.

पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर टायगर काळा सूट घालून, गॉगल लावून येताना दिसत आहे. त्याला पूर्ण बंदुकींनी घेरल्याचं दिसत आहे. तो शहराच्या मध्यभागी उभा असल्याचं दिसत आहे. त्याच्या एका हातात गन असल्याचं दिसत आहे.

डायरेक्टर अहमद खान हिरोपंती 2 सिनेमा बनवणार आहे. साजिद नाडियाडवाला हा सिनेमा प्रोड्युस करणार आहेत. सिनेमा 16 जुलै 2021 रोजी रिलीज होणार आहे. अहमद खान आणि टायगर श्रॉफ यांनी बागी 3 सिनेमातही एकत्र काम केलं आहे. टायगर श्रॉ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, अंकिता लोखंडे स्टारर हा सिनेमा 6 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.